मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या चारगाव येथे घरासमोर उभ्या ठेवलेल्या दोन ट्रॅक्टर च्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना दि.10 सप्टेंबर रोज बुधवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यातील ट्रॅक्टर मालक लोकेश छबिलाल राणे व जितेंद्र गुलाब ढबाले यांनी रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोर ट्रॅक्टर उभे ठेवले असता दोन्ही ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या अज्ञात आरोपींनी लंपास केले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.