मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कन्नड तालुक्याचे आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातील असे पाऊल उचलणारे ते पहिले आमदार ठरले आहेत. ५ सप्टेंबर रोजी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या संख्येने मुंबईत उपस्थित राहण्याचे आवाहनही दादांनी आज दि एक स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता केले आहे.