अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन पिकविमा, वीजपुरवठा, सिंचन, बाजारातील अडचणी आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ही माहिती अजित पवार गटाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.