एरंडोल तालुक्यात टोळी हे गाव आहे. या गावात भाग्यश्री संदीप मराठे वय २२ ही तरुणी आपल्या घरी होती. दरम्यान ही तरुणी आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून एरंडोल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.