तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे आज दि. 9 सप्टेंबर रोज मंगळवारला दुपारी 12 वा. ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत सरपंच चंदा कंठीलाल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकासाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष निवडीचा विषय घेण्यात आला. यावेळी ग्रामसभेतून माजी सरपंच गुरुदेव पारधी यांची तंटामुक्ती गाव समिती अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.