फिर्यादी संदीप श्रीरामे राहणार डाफेल आऊट पिपरी मेघे वर्धा हे दिनांक 20 मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास माडा कॉलनी येथे नळ फिटिंग च्या कामासाठी गेले होते त्यांनी त्यांची दुचाकी सदर काम सुरू असलेल्या घराबाहेर उभी करून ठेवले होते काही वेळा ते परत आले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही आजूबाजूला व परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आले नाही कुणीतरी अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी किंमत 22 हजार रुपये चोरून नेली असल्याची तक्रार फिर्यादी यांनी रामनगर पोलिसात दिली आहे.