वणी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. ८ सप्टेंबर, २०२५ रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान मुर्धानी परिसरात गस्त घालत असताना, पोलिसांनी विलास रमेश आडे (वय ३० वर्षे, रा. वाघदरा) आणि तुलशिराम भगवान काकडे (वय ३२ वर्षे, रा. गोकुळ नगर, वणी) यांना अवैध रेती वाहतूक करताना रंगेहाथ पकडले.