विनापरवाना गणेशोत्सवाची मिरवणूक काढून डॉल्बी,लेझर लाइटचा वापर करून जिल्हाधिकारी यांच्या ध्वनिप्रदूषणाबाबतच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सांगोला तालुक्यातील वाढेगाव व घेरडी येथील एकूण सात डीजे मालकांसह गणपती मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करून साहित्य जप्त केले. याबाबत, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास बनसोडे, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.