शेवडीपाडा तालुका साक्री येथे एका विहिरीमध्ये बिबट्या आढळल्याची घटना गावासह परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड धावपळ निर्माण झाल्याची स्थिती आढळून आली. पिंपळने वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ विहिरीत पडलेल्या बिबट्याला अथक परिश्रमानंतर बाहेर काढले त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गावातील दिगंबर गांगुर्डे हे बुधवार दि १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गाव शिवारातील विहिरीजवळून जात असत