बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी स्पष्ट केले की ओबीसी समाजात कोणताही मतभेद निर्माण झालेला नाही. त्यांनी सांगितले की, "लक्ष्मण हाके आणि माझ्यात तसेच ओबीसी बांधवांमध्ये मतभेद नाहीत. कधी मतभेद झाले असले तरी मनभेद झालेला नाही." वाघमारे पुढे म्हणाले की, ओबीसी समाजात फूट पाडण्यासाठी काही जण प्रयत्न करत असून त्यामागे "सुपारी" दिली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा कोणत्याही कटकारस्थानांना बळी न पडता आम्ही सर्व ओबीसी बांधव एकत्र आहोत.