नाशिकच्या साक्री - शिर्डी महामार्गवरील बागलाण तालुक्यातील वनोली गावाजवळ बस व मोटारसायकलचा अपघात, 3 ठार Anc: आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या साक्री - शिर्डी महामार्गवरील वनोली गावाजवळ एस टी बस व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन तीन मोटरसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. ताहाराबाद कडून येणाऱ्या नंदुरबार वसई या बसला हॉटेल अधिरा जवळील वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या मोटरसायकालचा ताबा सुटल्याने ते तिघेही बसच्या पुढच्या ड्राइव्हर जवळील चाकाजवळ घुसले