अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 06 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन व गरीब कुटुंबातील मुलीवर बलात्कार व लैंगिक छळाची गंभीर घटना घडली. या प्रकाराविरोधात अकोला मुस्लिम समाजाने आज पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. या प्रसंगी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्य व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.