पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस आणि मालनगाव व जामखेडी प्रकल्पातील विसर्गामुळे अक्कलपाडा धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३००० क्युसेकने सुरू झालेला विसर्ग रात्री ८ वाजता ४००० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. आवक वाढल्यास पूर्वसूचनेने विसर्ग वाढवला जाईल. नदीकाठच्या गावांतील व धुळे शहरातील नागरिकांनी खबरदारी घेऊन सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.