शहरात पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण दिसणार आहे. ईद-ए-मिलादुन्नबीचा सण ५ सप्टेंबरला असतानाही, जुलूस कमिटीने गणेश विसर्जनानंतर ९ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. २८ ऑगस्ट रोजी केएमटी हॉल येथे दुपारी 5 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. सलग तिसऱ्या वर्षी होणारा हा निर्णय सौहार्दाचे द्योतक असल्याचे सांगण्यात आले. ताजनगर कच्छी मशिदीतून मिरवणूक निघणार असून, या परंपरेत दोन्ही समाज परस्पर सत्कार करणार आहेत. या पत्रकार परिषदेस आ. साजिद खान पठाण व गण