पतीच्या मृत्यूनंतर बँक ऑफ इंडिया शाखेतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा दोन लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. बँक ऑफ इंडिया शाखा वढोली येथे घाटकुळ येथील अल्पभूधारक शेतकरी होनाजी जानबा चौधरी यांचे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या नावाने वार्षिक ४३६ रुपये भरून विमा काढला होता. महिनाभरापूर्वी आकस्मिक मृत्यू झाला होनाजी चौधरी यांची पत्नी सरिता होनाजी चौधरी यांना बँकेतील कर्मचारी यांनी विमा बद्दल माहिती सांगितली व त्यानंतर वारसदार सरिता यांना दोन लाख रुपये मिळणार असे सांगितले.