तालुक्यातील शेतकरी शेतमजूर यांच्या विविध मागण्यासाठी आज दि. 6 ऑक्टोबर रोजी देगलूर शहर बंद तथा eसकाळी 11 वाजता मदनूर नाका येथून रस्ता रोको आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने करत त्यानंतर खा. रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्याल्यासमोर आमरण उपोषण करणारे शेख मिरामोहियोद्दीन यांच्या उपोषण स्थळी भेट देत विराट सभा देखील घेण्यात आली आहे. सदरची सभा ही दुपारी तीनच्या सुमारास संपली आहे.