नरसी ते बिलोली रोडवर गंगा बार समोर नरसी येथे दि ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास यातील आरोपी महेशकुमार सैनी राहणार हरियाणा राज्य हा आपल्या ताब्यातील चौदा टायरी ट्रक क्रमांक एचआर ३९ बी ६०९८ यामध्ये १४ म्हशीचे रेडकु विनापरवाना बेकायदेशीर रित्या क्रूरतेने बांधून अवैध वाहतूक करीत असताना पोलीसांना मिळुन आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस हेडकाॅन्सटेबल मुक्तार शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.