शहरात सार्वजनिक गणेश मंडळातर्फे विवीध प्रभागात स्थापणा करण्यात आलेल्या श्री गणेशांचे मोठ्या उत्साहात गवराळा तलावात विसर्जन करण्यात आले.सायंकाळी ६ वाजेपासून गणेशांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.गांधी चोकात मिरवणुकीला बघण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली. विविध राजकीय पक्ष तथा संघटनांतर्फे गांधी चौकात गणेश मंडळांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.गणेश विसर्जन गवराळा तलावात शांततेत पार पडले.