लातूर -राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित देशमुख यांनी रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था, संघटना,काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांच्या भेटगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी,समस्या समजून घेऊन त्यांची निवेदने, निमंत्रणाचा स्वीकार केला.