पवई तलाव जसं निसर्गरम्य परिसर म्हणून प्रसिद्ध आहे तसं ते त्यातील मगरींच्या अधिवासाबाबतही तितकेच प्रसिद्ध आहे. या तलावात आढळून येणाऱ्या मगरींचे अनेकदा येथील पर्यटकांना दर्शन होते. तर, अनेकवेळा या मगरींनी मच्छीमार व पर्यटकांना जखमी केल्याच्याही घटना आहेत. परंतु, आज शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता कबुतरांचाही वावर असलेल्या या भागात एक कबुतर पक्षी जखमी अवस्थेत तलावात पडले. त्याला बाहेर निघता येईना बाहेर येण्यासाठी त्याची चाललेली तडफड अखेरची थांबली जेव्हा येथील एका