पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा ए आय प्रणाली द्वारे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला आहे . काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याचा आरोप करीत शनिवारी सकाळी अकरा वाजता देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जात आहे. दक्षिण रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे आज अलिबाग तालुक्यातील पेझारी इथं निषेध रॅली काढण्यात आली. भाजपा महिला आघाडीच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलं.