रेल्वेगाडीत चढताना गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणार्या दोघा चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून १ लाख ९० हजार रुपयांचे २० मोबाईल जप्त केले आहेत. बुद्धराज बागडी आणि अमरलाल बागडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंगळवार पेठेतील सिग्नल चौकात झोपडी टाकून राहणार्या या दोघांच्या झोपडीतून २० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.