साकोली येथील झाशीराम मडावी वय 74 व मुलगा केदार झाशीराम मडावी वय40 या दोघांनीही साकोली येथे अनेकांच्या घरी भाड्याने राहून त्यांचे घरभाडे बुडवले आहे. दुकानातून उधारीने सामान घेऊन ते पैसे न दिल्याने तसेच एका गरीब महिलेचे 60हजार रुपये उधारीने मागून तेही न दिल्याने तसेच शासकीय जमीनीवर अतिक्रमण करून ही जागा विकणे अशा अनेक आरोप असणारे या दोघांची तक्रारकर्ताने तक्रार केल्याने शुक्रवार दि.29 ऑगस्टला दुपारी चार वाजता या दोघांवर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे