शहरात मोकाट गुरांचा मोठा सुळसुळाट झाला असुन रस्त्यांवर संचार करीत असलेल्या मोकाट गुरांमुळे नागरीक त्रस्त झाले आहे. या गुरांनी एका वृध्दावर हल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे.त्यामुळे शहरात फिरत असलेल्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अन्यथा भाकपतर्फे आंदोलन करण्यात येइल असा इशारा भाजपतर्फे राजु गैनवार यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.