भंडारा तालुक्यातील ग्राम गणेशपुर येथे ग्रामपंचायत समोर तान्हा पोळ्याचे आयोजन समस्त ग्रामस्थ व आयोजक मंडळाच्या वतीने दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान करण्यात आले होते. तान्हा पोळा आयोजन समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून दीपप्रजलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या तान्हा पोळ्याच्या उत्सवात गावातील बालगोपालांनी आपले लाकडी नंदीबैलाना सजवून या ठिकाणी आणलेले होते. यात उत्कृष्ट सजावट असलेल्या लाकडी नंदीबैलांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.