जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आज रविवार ७ सप्टेंबर रोजी गंगाखेड शहरातील तारू मोहल्ला, जैदीपुरा येथून भव्य मोहंमदी जुलूस मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक नेहरू चौक ते मुख्य रस्त्यावरून बस स्थानकाजवळील रजा मस्जिद येथे पोहचताच जुलूसची सांगता करण्यात आली. त्यानंतर दुपारी २:३० वाजता शहरातील जीपी गार्डन फंक्शन हॉल येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १५ जोडपी विवाहबद्ध झाली असुन नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.