मुरगूड शहरातील महालक्ष्मी नगर येथे मध्यरात्री बंद घरे फोडून चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली.या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नंदकिशोर स्मार्ट यांच्या घरातील चोरट्यांनी मौल्यवान वस्तूंसह सीसीटीव्हीचा डीव्हीआरही लंपास केला.विशेष म्हणजे, घरात प्रवेश करण्याआधी चोरट्यांनी बाहेरील कॅमेऱ्याची दिशा बदलत,डीव्हीआरसह महत्त्वाचे पुरावेही नष्ट केले.