जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात जनसुरक्षा संघर्ष समितीच्या वतीने आज अलिबाग येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस अॅड. श्रद्धा महेश ठाकूर, जनसुरक्षा संघर्ष समिती, आप, पी.आय., सेक्युर भारत, भारत जोडो अभियान यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.