निमगुळ येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चंद्रग्रहणाविषयी जनजागृती मोहीम राबवली. ‘ग्रहण हे धोकादायक नसून पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने होणारा खगोलीय आविष्कार आहे,’ असे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी स्पष्ट केले. सुतक, उपवास, अन्नपाणी टाकणे, गर्भवतींवर बंधनं अशा रूढींना शास्त्रीय आधार नसल्याचे सांगत नागरिकांना अंधश्रद्धांना बळी न पडता ग्रहणाचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थ व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.