साकोली येथे बस स्थानकाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व साकोली पोलिसांच्या पथकाने धाड टाकून सहा आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून नगदी रुपये व मोबाईल व इतर मुद्देमाल असा एकूण दोन लाख एकोणवीस हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरल हसन यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई गुरुवार दिनांक 21 ऑगस्टला दुपारी चार वाजता करण्यात आली आहे