बीड जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांच्या वतीने अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आज विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, महिला, पुरुष तसेच बैलगाड्या घेऊन आलेले शेतकरी सहभागी झाले होते. गावागावातून शेतकरी मोर्चासाठी एकत्र जमले होते. शेतकऱ्यांचे हातात फलक, झेंडे होते तर काहींनी आपल्या बैलगाड्यांसह हजेरी लावून आंदोलनाला पारंपरिक रूप