: येरवडा परिसरात मध्यरात्री दुचाकीस्वारांनी एका युवकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिंगरेनगर येथील २७ वर्षीय युवक हा दि. ५ सप्टेंबर रोजी रात्री साधारण १२.०५ वाजण्याच्या सुमारास सावंत पेट्रोलपंप ते कॉमरझोन रस्त्याने पायी जात होता. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्याच्या पाठीमागून येत त्याच्या हातातील किंमत सुमारे २५ हजार रुपयांचा मोबाईल फोन हिसकावून पोबारा केला. य