शहरात अतिक्रमणमुक्त मोहिमेअंतर्गत आज महापालिका अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली.गर्दीची व प्रमुख बाजारपेठ समजली जाणारी बेगम पेठ तसेच विजापूर वेस परिसरात सकाळपासून ही मोहीम राबविण्यात आली.बेगम पेठेतील अनेक दुकानदारांनी दुकानासमोर शेड उभारून व साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते. या शेड्स जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले.