खडकी ते वाघोली रोडवरील वाघाडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने काल सायंकाळी आलेल्या पावसाने अतिवृष्टीने बांधकाम वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले वाघोली गावचे दळणवळण बंद झाले... तर वाघाडी नदीला पूर आल्यामुळे कारंजा घाडगे तालुक्यातील बोरगाव गोंडी ते माळेगाव ठेका या मार्गावरील पुलावरून चार गाई वाहून गेल्या बाकी जनावरे थोडक्यात बचावली पुलाची उंची वाढविण्याची मागणी असून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजीचा सूर ग्रामस्थांचा आहे