वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथील एक युवक सकाळी गणपती विसर्जनासाठी अरुणावती नदीकाठी गेला असता दुर्दैवी प्रकार घडला. विसर्जनाच्या दरम्यान अचानक पाय घसरल्याने तो नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून पोलिस प्रशासनालाही माहिती कळविण्यात आली आहे.