गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीतील मौजा खापा खुर्द येथे दि. 28 ऑगस्ट रोज गुरुवारला सायं.5 वा.च्या सुमारास महसूल पथकाचे तलाठी लक्ष्मीकांत ठवकर हे आपल्या महसूल पथकासह पेट्रोलिंगवर असताना त्यांना ट्रॅक्टर क्र.MH - 36 - AG - 9424 यात विनापरवाना एक ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महसूल पथकाने सदर ट्रॅक्टर व एक ब्रास रेती गोबरवाही पोलिसात जप्त केला असून ट्रॅक्टर चालक जयपाल गजाम व ट्रॅक्टर मालक विरुदेव भोंडे यांच्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.