अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग ५१.१६ घनमीटर प्रति सेकंदावरून वाढवून १९७.९३ घनमीटर प्रति सेकंद करण्यात आला आहे. याकरिता धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग वाढविणे किंवा कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे..दरम्यान, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.