पिक विमा वाटपातील गंभीर विसंगतींवर तीव्र नाराजी व्यक्त करत आज सकाळपासून चिखली येथील पिकविमा कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने कार्यालयात दाखल झाले असून वातावरण चांगलेच तापले.मागील महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होत आहे. मात्र, एका शिवारातील शेतकऱ्याला सहा ते सात हजार रुपये मिळत असताना, त्याच शिवारातील दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात केवळ शंभर रुपये जमा झाले