तुमसर तालुक्यातील नेहरू वॉर्ड हसारा येथे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत १७,१३० रुपये किंमतीचा अवैध मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेहरू वॉर्ड हसारा येथे राहणाऱ्या सुनिल दिनेश पटले (वय ३२) याच्या घराची झडती घेतली असता, घरातील मागील खोलीमध्ये हा तंबाखूचा...