पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेडली फार्मा या कंपनीत वायू गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर बोईसर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापनातील संचालक सोहेल खातीब, मुख्य आर्थिक अधिकारी देवेंद्र भगत, प्रकल्प प्रमुख धर्मेश पटेल व देखभाल अभियंता शुभम ठाकूर या चौघांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक व आरोग्य संचालनालय प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागामार्फत देखील चौकशी सुरू आहे.