मराठा समाज हा कुठल्याही संकटात किंवा अडचणीत असताना एकटा राहणार नाही, त्यांच्यासोबत ताकतीने उभे राहू, असे आश्वासन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिले. गेवराई येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना पंडित म्हणाले की, “मराठा समाजाची ताकद ही एकजुटीत आहे. समाजाने ठरवलं की आंदोलन करायचं, तर मीसुद्धा त्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभागी होणार. मतदार संघात मराठा समाजाने आपली ताकद आणि ऐक्य दाखवून द्यायला हवे.” त्यांनी पुढे सांगितले की, कोणत्याही माग