भद्रावती शहर तथा तालुक्यात श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असुन श्री गणेशाच्या आगमनामुळे शहर तथा तालुक्यातील वातावरण भक्तीमय झाले आहे.शहरात तथा तालुक्यात घरघुती गणपतींची विधिवत स्थापना करण्यात आली.तर भोजवार्ड येथील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या सुयोग गणेश मंडळाच्या गणपतीसह शहरात सायंकाळी सार्वजणीक गणपतींची स्थापणा होत आहे. याशिवाय तालुक्यातील माजरी, चंदनखेडा, नंदोरी, घोडपेठ या गावांसह इतर गावातही घरघुती तथा सार्वजणीक गणेशाचे आगमन झाले.