ओबीसी आरक्षणासंदर्भातील १ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या राज्य सरकारच्या जीआरचा निषेध करत आज अकोल्यात ओबीसी समाज आक्रमक झाला. संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली व वादग्रस्त जीआरची होळी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार हरिदास भदे यांनी मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा आरोप करत, “मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली,” असे म्हटले. ओबीसी नेत्यांनी हा GR त्वरित मागे घेण्याची मागणी केली असून आंदोलन केल