श्रावण महिन्याच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथील श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सालाबाद प्रमाणे श्री केदारेश्वर मंदिरामध्ये शुक्रवारी श्री 108 सत्यनारायण पूजा करण्यात आल्या. शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी श्रावण मास भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मासाच्या सांगतेनिमित्त दरवर्षी श्री केदारेश्वर मंदिरामध्ये 108 सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. भाविक भक्त हे उभय दांपत्य सत्यनारायण पूजेला बसतात. पश्चिम महाराष्ट्रातील आगळीवेगळी धार्मिक परंपरा आहे.