देऊरवाडा येथे पूर्णा नदीत पोहण्याकरिता गेलेल्या आदेश गंगाधर 15 नावाच्या 27 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 6 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. दिनांक 6 सप्टेंबरला तो नदीपत्रात पोहण्याकरिता गेला असताना नदीपात्रातील वेगवान पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. डी डी आर एफ च्या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवुन आज दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी सात ते आठ वाजता चे दरम्यान त्याचा मृतदेह आढळून आला.