हिंगणा मार्गावरील वासुदेवनगर मेट्रो स्थानकाजवळील ओयो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.राजेंद्र नगर ले-आउटमधील रेणुका कॉम्प्लेक्समधील ओयो अर्बन रिट्रीटमध्ये हा प्रकार सुरू होता. खबऱ्यांकडून पोलिसांना माहिती मिळाल्यावर तेथे डमी ग्राहक पाठविण्यात आला. त्याने इशारा दिल्यावरतेथे पोलिसांनी धाड टाकली.