बुलढाणा नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असून कंत्राटदाराकडून सफाई कामगारांना 6 ते 7 हजार रुपये मानधन दिले जात आहे,मात्र 18 हजार रुपये मानधनावर स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप करत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे,या मागणीसाठी बुलढाणा येथून मंत्रालय मुंबईच्या दिशेने हे कर्मचारी आज पायी रवाना झाले आहेत.