हजरत मोहमंद पैगंबर यांच्या 1500 योमे-विलादत दिनानिमित्त पवनी येथील मुस्लिम बांधवानी जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी मोठया उत्सहात साजरी करण्यात आली. मिलादुन्नबी प्रसंगी दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता जामा मस्जिद येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मुख्य मार्गानी गौतम वॉर्ड, काजीपुरा, विठ्ठल गुजरी चौक, घोडेघाट चौक, तुकडोजी महाराज चौक, आंबेडकर चौक, सराफा लाईन, अहीरपुरा चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, नगर परिषद चौक, गांधी भवन व भाईतलाव वार्डची परिक्रमा घालून रॅलीचा समारोप जामा मस्जिद येथे झाला.