भयंकर अपघात कुर्ला रेल्वे स्टेशनवर घडला आहे त्यामध्ये एक व्यक्ती रेल्वेतून खाली पडली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन रेल्वे ट्रॅकच्यामध्ये असणाऱ्या गटारात हा व्यक्ती उलटा पडला आहे. यावेळी काही प्रवासी पुढे आले आणि त्या व्यक्तीला नाल्यातून बाहेर काढून त्याला रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून रुग्णालयात उपचारासाठी घेवून जाण्यात आले आहे ही सर्व घटना आज शुक्रवार दिनांक ०६ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे