रावेर तालुक्यात निंभोरा हे गाव आहे.या गावापासून रावेर दरम्यान जाणाऱ्या रेल्वे रुळावर खांब क्रमांक ४७१/११-१३ जवळ पठाणकोट एक्सप्रेसच्या धडकेत ३५ वर्षीय अनोळखी तरुण ठार झाला. याची माहिती निंभोरा पोलिसांना देण्यात आली. पथक त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी मृतदेह रुग्णालयात नेला व ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. तर याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.